….म्हणून प्राप्तिकर विभाग देणार 5 कोटी रुपये

मुंबई: जर तुम्ही प्राप्तिकर विभागाला काळ्या पैशांची सूचना दिली तर तुम्हाला पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. होय, अशी माहिती प्राप्तिकर विभागाकडून देण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाने ‘इन्कम टॅक्स इन्फॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम 2018’ची घोषणा केली आहे. यानुसार परदेशातील अघोषित संपत्तीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचे बक्षीस देण्यात येईल. कर चोरी आणि बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर विभागाला दिल्यावरही बक्षीस दिले  जाणार आहे.

एखाद्या व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळे कर चोरी पकडली गेल्यास, त्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बक्षिसाची रक्कम पकडण्यात आलेल्या रकमेच्या 10 टक्के इतकी असेल. कर चोरी उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीस जास्तीत जास्त पाच कोटींची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. याआधीच्या म्हणजेच 28 ऑगस्ट 2015 रोजी देण्यात आलेल्या आदेशांनुसार कर चोरीची सूचना देणाऱ्या व्यक्तीला लगेच एक लाख रुपयांचे बक्षिस दिले जाते. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास झाल्यावर एकूण करचोरीच्या रकमेपैकी 10 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)