…म्हणून डबेवाल्यांच्या कामात विश्‍वसनीयता

रघुनाथ मेदगे : आवटे महाविद्यालयात मुंबईच्या डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटचे धडे

मंचर: मुंबई येथील डबेवाल्यांची त्याच्या कामाशी आध्यात्मिक नाळ जुळलेली असल्याने आपले काम करण्याची डबेवाल्याची प्रेरणा अधिक खोलवर आहे. म्हणून यात विश्‍वसनियता आहे, असे विचार मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील रोटरी क्‍लब मंचर व अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रघुनाथ मेदगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. मोहन साळी, मंचर रोटरी क्‍लबचे अध्यक्ष सचिन चिखले, माजी अध्यक्ष सचिन बांगर, उपप्राचार्य सोमनाथ वामन आदी मान्यवर उपस्थित होते. देशातल्या सर्वांत व्यग्र शहरापैकी असलेल्या मुंबई शहरात ते दररोज पायी चालत, सायकलवर प्रवास करत लाखो लोकांना जेवण पोहोचवतात. हे काम ते कसे करतात, या अव्वल मॅनेजमेंटचे धडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आम्ही आमच्या कामात वक्तशीरपणा व निर्दोष कार्यप्रणाली कशी उभारली आहे. याचे प्रात्यक्षिक रघुनाथ मेदगे यांची पीपीटीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना दाखविले. शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक शंकांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. डबेवाल्यांची आपल्या कामाप्रती प्रामाणिक बांधिलकी असल्याने व त्यांनी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ काम मानल्याने डबेवाल्यांची आदर्शभूत अशी निर्दोष कार्यप्रणाली उभारली आहे. अशी भावना आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन चिखले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वैशाली सुपेकर यांनी केले. उपप्राचार्य सोमनाथ वामन यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)