मोहोळनगरची कातकरीवस्ती उजळून निघाली

तीस कुटुंबांना मिळत्तले वीजमीटर ः बाराही महिने असलेला अंधार दूर

हिंजवडी-बाराही महिने अंधारात जीवन व्यतीत करणाऱ्या कातकरी बांधवांना युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाल्याने त्यांचा अंधार दूर झाला आहे. भोर विधानसभेचे युवक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल जाधव व सेवादल अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या प्रयत्नांतून अंबडवेट (ता. मुळशी) येथील मोहोळनगर या कातकरी वस्तीवर वीजमीटरचे वाटप करण्यात आले आहे.
आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून मुळशी तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्षा कांताताई पांढरे व कॉंग्रेस उपाध्यक्ष शंकर बत्ताले यांनी या वीजमीटरसाठी पाठपुरावा केला होता. आमदार थोपटेंच्या हस्तक्षेपामुळे महावितरणकडून वीजमीटरची पूर्तता त्वरित झाली. हे वीजमीटर 30 कातकरी कुटुंबांना प्रदान करण्यात आले असून कार्यन्वितही झाल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली. त्यामुळे मोहोळनगर ही कातकरीवस्ती उजळून निघाली आहे. तसेच येथील अंधार कायमचा दूर झाला आहे.
पाठपुरावा आणि आर्थिक सहाय्य या दोन्हीच्या माध्यमातून कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून 30 कुटुंबांना हा आधार मिळाल्याने तालुक्‍यात याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भोर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल जाधव व मुळशी तालुका सेवादल अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या आर्थिक साह्यातून 30 आदिवासी कातकरी बांधवांच्या कुटुंबांना हक्काचे वीजमीटर मिळाले असल्याने कातकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. वीजमिटर प्रदान करतेवेळी राहुल जाधव, संतोष गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अरूण गाभणे, सोमनाथ मातेरे, शंकर बत्ताले, आशिष नागरे, कातकरी बांधव उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)