मोहितेंवरील कारवाई हा राजकीय सूड

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांचा प्रतिहल्ला : खेड तालुक्‍यात 125 निषेध सभा

चाकण – मराठा आंदोलनाप्रकरणी चाकण पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर 120 (ब) कलम वाढविण्याचा व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर होणारी कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचे मत पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.

खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात दंगलप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तो केवळ राजकीय द्वेषापोटी करण्यात येत असून याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर खेड तालुक्‍यात ठिकठिकाणी सुमारे 125 निषेध सभा झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रदीप गारटकर म्हणाले की, चाकण दंगलीचा तपास करण्यासाठी एक वर्ष इतका प्रदीर्घ कालावधी घेऊनही गुन्हेगाराऐवजी पोलीस निरपराध कार्यकर्त्यांवर कारवाई करीत आहेत. आंदोलन हिंसक व्हावे या प्रवृत्तीने दंगलीत असणाऱ्या बाह्य शक्तींचा शोध घ्यावा तसेच संभाव्य विधानसभा निवडणूक तोंडावर असताना हा मुद्दा चर्चेत येणे म्हणजेच राजकीय डाव आहे.
गारटकर म्हणाले की, माजी आमदार दिलीप मोहिते यांचे दंगली दरम्यानचे कोणते कृत्य आक्षेपार्ह वाटले याचा खुलासा करावा. हीन दर्जाचे व रडकं राजकारण करण्याचे थांबवून समोर येऊन लढावे असे सांगून ते म्हणाले, न केलेल्या गुन्ह्यात अटक करण्याची प्रशासनाची भूमिक निषेधार्थ आहे. या भूमिकेचा आम्ही लोकशाही व सनदशीर मार्गाने विरोध करणार आहोत. जर निरपेक्ष भूमिकेतून कारवाई न झाल्यास राजकीय उद्रेक होण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. तसेच कारवाईच्या निषेधार्थ जनतेचा कौल वाढत असून राष्ट्रवादीचे मित्र पक्षांसह, बैलगाडा संघटना, मनसे, कॉंग्रेस आदींनी पाठिंबा दिला असल्याची माहिती गारटकर यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, चाकण शहर अध्यक्ष राम गोरे, निलेश कड, आनंद गायकवाड, बाळशेठ ठाकूर, विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, निर्मला पानसरे, संध्या जाधव, राहुल नायकवाडी, सयाजी गांडेकर, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)