सुरांचे बादशहा मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी…

मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी…३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफी हे जग सोडून गेले …आपल्या मधाळ गायकीने हिंदी चित्रपट संगीतावर छाप उमटविणाऱ्या या सुरांच्या बादशहाबद्दल जाणून घेऊयात काही खास गोष्टी …

२४ डिसेंबर १९२४ रोजी रफी यांच्या जन्म पंजाब मधील कोटला सुलतान या गावात झाला. त्यांच्या घरी सहा भावंडांमध्ये रफी जी सर्वात लहान होते. लहानपणी त्यांच्या घराजवळून एक फकीर गाणं गात जायचा. लहानगे रफी त्या फकिराच्या मागे जाऊन गाणी ऐकायचे. याच फकीराकडून मोहम्मद रफी यांना गाण्याची प्रेरणा मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे रफी यांचे वडील लाहोर मध्ये राहायला आले. लाहोरमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे रफी यांचा आवाज सगळ्यांसमोर आला. त्या काळातले मोठे गायक के. एल. सहगल यांचा लाहोर मध्ये एक कार्यक्रम होता, सहगल स्टेजवर जाणार नेमकं त्यावेळी तिथले लाईट गेले. सहगल मोठे कलाकार असल्यामुळे आयोजकांपुढे प्रश्न उपस्थित झाला, की आता वेळ मकासी मारून न्यायची. तेव्हा रफी यांच्या एका नातेवाईकाने आयोजकांना मोहम्मद रफी यांच्याविषयी सांगितले. आयोजकांनी त्यावेळी तरुण मोहम्मद रफी यांना गाणं गायची संधी दिली, आणि उपस्थित प्रेक्षकांना रफी यांचा आवाज खूप आवडला. तिथून रफी यांची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

नीलकमल या चित्रपटातील ‘बाभूळ की दुवाये लेती जा…’ हे गाणं गाताना रफी यांच्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं. याचं कारण म्हणजे हे गाणं रेकॉर्ड करायच्या आदल्या दिवशी रफी यांच्या मुलीचा साखरपुडा झाला होता, त्यामुळेच खूप भावुक होऊन ते गाणं गात होते. विशेष म्हणजे या गाण्यासाठी मोहम्मद रफी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
हिंदी चित्रपट सृष्टीत अगदी सुरुवातीला मुकेश आणि तलत मेहमूद या दोनच गायकाची नावं सगळ्यांसमोर असायची.

त्यावेळी रफींना कुणी ओळखतही नव्हतं. त्यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांनी बैजू बावरा या फिल्मसाठी मोहम्मद रफी यांना संधी दिली, शिवाय नौशादजी त्यावेळी म्हंटलेही होते, की या चित्रपटापासून सगळ्यांना रफी यांचं नाव लक्षात राहील…आणि झालंही तसंच. या चित्रपटापासून रफींनी त्यांच्या मधाळ गायनाने सगळ्यांचीच मनं जिंकली.
मोहम्मद रफी यांना ६ फिल्मफेअर आणि १ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारत सरकार तर्फे त्यांना पदमश्री पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आलं होतं. ३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफी हे जग सोडून गेले. आज त्यांना जाऊन ३८ वर्ष पूर्ण होत आहेत…

आजही रफी यांचं गाणं लागलं की आपोआपच सगळ्यांचे कान तिकडे जातात…
अशा या सुरांच्या बादशहाला भावपूर्ण आदरांजली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)