मोशीत भाजीपाल्याची आवक घटली

पिंपरी – या आठवड्यात मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली आहे. भाव मात्र तेजीत आहेत. या आठवड्यात टोमॅटोचे भाव उतरले असून आवक वाढली आहे. तर कांदा, बटाटा आणि कैरीची आवक मात्र घटली आहे.

पालेभाज्यांचे भाव दुपटीने वधारले आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 660 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 19 हजार 605 गड्ड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 306 क्विंटलने घटली आहे, तर पालेभाज्यांची आवक एक हजार 135 गड्ड्यांनी घटली. कांद्याची 37 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 59 क्विंटलची घट झाली असून, सरासरी भाव स्थिर राहिला. बटाट्याची 61 क्विंटल आवक झाली असून, भाव मात्र स्थिर राहिले. भेंडीची आवक 10 क्विंटलने घटून भावात 100 रुपयांची वाढ झाली.

गवारीची आवक चार क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची आवक 180 क्विंटलने होऊन भाव मात्र 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली. मटारची आवक तीन क्विंटलने घटली असून, भाव 1500 रुपयांनी वधारले. घेवड्याची आवक तसेच आल्याची 18 क्विंटल आवक घटून भाव 500 रुपयांनी वधारले. घोसावळ्याची आवक तीन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घटले. लिंबांची आवक एक क्विंटलने घटून भावात 500 रुपयांची वाढ झाली.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सात हजार 280 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची चार हजार 805 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची 850 गड्ड्या, मुळे 100 गड्ड्या, पुदीना 900 गड्ड्या, पालक तीन हजार 190 गड्ड्या, चवळीच्या 900 गडड्या आवक झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)