‘मोमो व्हॉट्‌स अॅप चॅलेंज’ ठरतोय डोकेदुखी

इंटरनेटचे जाळे आज जगभर पोहचले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात काय चालू आहे याची आपणास काही सेकंदात माहिती मिळते. फेसबुक, व्हॉट्‌स अॅप, ट्विटर, ऑर्कुट, लिंक्‍ड इन, वी चॅट आणि अशा अनेक सोशल मीडिया आणि संवाद साधण्याच्या नवीन अॅप्लिकेशनमुळे आपण दोन जीवन जगात आहोत. एक म्हणजे आपले वास्तविक जीवन आणि दुसरे आभासी जीवन म्हणजेच आपली सोशल लाईफ.

आपल्या सोशल लाईफमुळे देखील आपण अनेक अडचणीत सापडत आहोत. सायबर बुलींग, स्टॉकिंग यामुळे अनेकांनी आपले जीव देखील दिले आहेत. लहान मुले आणि तरुण आपला जास्त वेळ या आभासी दुनियेत घालवतात. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल या गेम्समुळे मागच्या वर्षी अनेकांनी आपले जीव गमविल होते. यावर्षी आणखी एक नवीन प्रकार पुढे आला आहे, तो म्हणजे “मोमो व्हॉट्‌स अॅप चॅलेंज.’ लॅटिन अमेरिका आणि युरोपात या मोमो चॅलेंजने चांगलाच हैदोस घातला आहे. अनेक किशोरवयीन मुले-मुली या चॅलेंजला बळी पडले आहेत आणि जीव गमावून बसले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतामध्ये देखील दोघांनी आपला जीव या चॅलेंजमुळे गमवाला आहे. पहिली घटना जयपूर मधील आहे. त्यात एका 16 वर्षीय छवी नामक मुलीने वाढदिवसाच्या तिसऱ्याच दिवशी राहत्या खोलीत गळफास लावून घेतला. तर दुसऱ्या घटनेत 18 वर्षीय मनीष सरकीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोमो व्हॉट्‌स अॅप चॅलेंजमध्ये तुमच्याशी व्हॉट्‌स अॅपच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. त्यात जर तुम्ही त्यांचे सांगितलेले कार्य (टास्क) केले तर तुम्हाला पुढील कार्य दिले जाते, नवीन चॅलेंज दिले जाते. प्रथम ते मजेशीर आणि हलके-फुलके चॅलेंजेस देतात. नंतर अंगावर जखमा, खुणा यासारखे चॅलेंज दिले जाते आणि याचा शेवटचा टप्पा हा ब्लू व्हेल गेमप्रमाणे आत्महत्येचा असतो. या चॅलेंजमध्ये शेवटी गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते.

भारतामध्ये पाश्‍चात्य देशाचे अनुकरण मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे भारतीयांसाठी हे मोमो व्हॉट्‌स अॅप चॅलेंज खूपच घातक ठरू शकते. त्यामुळे ज्या लहान मुलाकडे स्मार्ट फोन आहेत. अश्‍या मुलांच्या पालकांनी त्यांच्याकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे आणि जे किशोरवयीन त्यांनी या आभासीपणाला बळी पडू नये. जर मोमो व्हॉट्‌स अॅप चॅलेंजचा मेसेज आला तर त्याला रिप्लाय न देता तो नंबर ब्लॉक करावा आणि त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा.

– राजकुमार ढगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)