मोबाईल मेसेज्‌ आमंत्रणावर संयोजकांचा भर

कापूरहोळ- लग्नाचे निमंत्रण घेऊन लोक बारशाला नाही गेले म्हणजे मिळवलं.., असं लोक पूर्वी उपहासाने म्हणत असायचे. कारण, पूर्वी दळणअभावी साधने मर्यादित होती. त्यामुळे गावोगावी पाहुणे, आप्तेष्टांना लग्नपत्रिका पाठविणे सर्वात जोखमीचे काम मानले जात असे, लग्नसोहळा हा जीवनातील आनंदाचा आणि अविस्मरणाचा सोहळा असला तरी तो धावपळीचा सोहळा असतो. आता, आधुनिक काळात मात्र परिस्थिती बदलली आहे. लग्नासह अन्य कार्यक्रमांची निमंत्रणं आता मोबाईलवरून “एसएमएस’ व “रेकॉर्डिंग कॉल’ वरून दिली जात आहेत. दूरगावी असलेले नातेवाईक, आप्तेष्ट यासह मित्रांना आमंत्रण द्यायचे असेल तर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा आधार वाटत आहे.
राजकारणातील पदाधिकारी, उद्योजक यासह काही निवडक दिग्गज मंडळी अशी हायटेक निमंत्रणे पाठवीत होती. आता, मात्र या सुविधा महागाईच्या जमान्यात अतिशय स्वस्त दरात उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे मोबाईल संदेश यंत्रणेचा वापर वाढला आहे. स्वस्त आणि विश्‍वासार्ह माध्यम म्हणून मोबाईल मेसेज्‌ व व्हाईस रेकॉर्डिंग कॉलचा वापर वाढल्याचे यावेळी दिसून आले. आधुनिक युगात माणूस एकमेकांपासून रोजगार, व्यावसायानिमित्त दूर गेला. पण, त्यांच्यातील स्नेहसंबंध जपायचे काम मोबाईलद्वारे होत आहे.
कुठलाही आनंद सोहळा असला की सर्वांसाठीच ही जिव्हाळ्याची बाब असते. दूर अंतरावरील नातेवाईक, मित्रमंडळीने अशा सोहळ्यांत उपस्थित असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, आमंत्रण देण्याची मोठी अडचण पूर्वी होती. परंतु, यावर पर्याय म्हणून मोबाईल मेसेज तसेच व्हॉटस्‌ ऍप, फेसबुक अशा माध्यमातूनही आमंत्रण पाठविली जात आहेत. मोबाईलमुळे तळागाळापर्यंत सहज निरोप पोहोचविण्याचे काम वेगाने पूर्ण होत आहे.

  • पत्रिकांची क्रेझ कायम…
    लग्नसोहळ्यासह अन्य कार्यक्रमांची वैशिष्ट्यपूर्ण आमंत्रण पत्रिका छापण्याची “क्रेझ’ काही गावांत आजही कायम आहे. राजेशाही पद्धतीच्या पत्रिका ते नव्या तंत्राच्या आधारे केलेल्या आकर्षक पत्रिकेत भरगच्च मजकूर आणि नातेवाईकांच्या नावांची भली मोठी यादी व ठरलेली वाक्‍यरचना, अशा साचेबद्ध पद्धतीची पत्रिका आजही तेवढ्याच आवडीने छापली जाते, अशा पत्रिका प्रत्यक्ष घरी जाऊन नातलगांना देत आग्रहपूर्वक निमंत्रण दिले जाते. परंतु, हे काम वेळखाऊ असल्याने याकरिता गावे, नातेवाईक असे गठ्ठे तयार करून हे काम विभागून करण्याची हौस आजही आवडीने जपली जाते आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)