डॉ. राजेंद्र माने
निद्रा ही जरी नैसर्गिक शारीरिक गरज असली तरीही गेल्या काही वर्षात त्याचं महत्त्व कमी झालं आहे. जनसामान्यांत त्याबद्दल अनेक गैरसमजुती आहेत. त्यावर सत्तरच्या दशकापासूनच सिनेमाची गाणे, झोप न येणे हे किती आनंददायी व प्रतिष्ठेचं आहे असे दर्शवितात. म्हणूनच निद्रा महत्त्वाची आहे असं वाटतच नाही. त्यातच अजून भर म्हणून गेल्या दशकात सोशल मीडिया व मोबाईल स्क्रीनमुळे निद्रानाश होतेय.
मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपमुळे निद्रानाश (भाग 1)
चांगल्या झोपेने टळतो प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोग
सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात शांत झोप दुर्मीळ झाली आहे. अपुऱ्या झोपेचे शारीरिक व मानसिक असे दोन्ही दुष्परिणाम होत असतात. चांगली झोप लागल्यास व्यक्तीला काम करण्यामध्ये अधिक उत्साह वाटतो. इतकेच नव्हे तर चांगल्या झोपेमुळे प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगाची शक्यताही कमी होते, असा महत्त्वाचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. विशेषत: पुरुषांमध्ये हा आजार टाळता येऊ शकतो.
पुरुषांमध्ये मेलॅटॉनिन नावाचे संप्रेरक मोठ्या प्रमाणात असते. या संप्रेरकाचा संबंध झोपेशी आहे. या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास प्रोस्टेट कर्करोग वाढण्याची शक्यता वाढते. हे संप्रेरक सर्वसाधारणपणे रात्री कार्यान्वित होत असतात. झोपमोडीचा किंवा अन्य घटकांचा मोठा परिणाम मेलॅटॉनिनवर होत असतो. मेलॅटॉनिन कमी प्रमाणात निर्माण झाल्यास कर्करोग होण्याची शक्यता वाढते, असे हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एपिडेमोलॉजी विभागाच्या डॉक्टर सारा सी मार्क्ट यांनी सांगितले.
ज्या व्यक्तीमध्ये मेलॅटॉनिनचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा अधिक आढळते. त्यांच्यात कर्करोगाचे प्रमाण अत्यंत कमी आढळते. मेलॅटॉनिनचे उत्पादन आणि लघवीच्या पातळीशी असलेल्या कर्करोगाच्या संबंधांबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधकांनी 2002 ते 2009 या काळात 928 जणांवर संशोधन केले. या संशोधनासाठी त्यांनी 928 जणांना झोपेविषयक अनेक प्रश्न विचारले. सातपैकी एका व्यक्तीला निद्रानाशाची समस्या होती. तर पाचपैकी एका व्यक्तीला काही प्रमाणात निद्रानाशाची समस्या जाणवत होती. तर तीनपैकी एका व्यक्तीला औषधे घेतल्यानंतरच झोप येत होती. पुरेशी झोप मिळालेल्या व्यक्तीपेक्षा झोपेसाठी औषधे घेणा-या व्यक्तीमध्ये 6 सल्फाटॉक्सिमेलॅटॉनिन’चे प्रमाण कमी असते. या 928 व्यक्तींपैकी 111 व्यक्तींना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले.
त्यापैकी 24 जणांमध्ये कर्करोग दुसऱ्या टप्प्यात आढळला. तर 31 टक्के व्यक्तींमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले. अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्चच्या बैठकीत हे संशोधन मांडण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा