मोबाईलचोरीतील आरोपी बुलढाण्यात गजाआड

येरवडा- संगमवाडी पार्किंगमधून 35 मोबाइलचे पार्सल चोरी करणाऱ्या आरोपीस येरवडा पोलिसांनी बुलडाणा येथे नुकतेच अटक केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गजानन उकंडा भालेराव (वय 44, रा. निमगाव, ता. देऊळगावराजा बुलडाणा) याला अटक केली आहे. त्याला 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. अटकेतील आरोपींकडून चार लाख 55 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 8 एप्रिल 2018 रोजी संगमवाडी पार्किंग क्रमांक 3 येथून चिंतामणी ट्रॅव्हल्सजवळ एका व्यापाऱ्याचे 35 मोबाईल हॅण्डसेट असलेले पार्सल अज्ञात आरोपीने चोरी केले.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तपासात कंपनीच्या वतीने मॅनेजरला दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यानंतर येरवडा पोलिसांनी केलेल्या तपासात मोबाइल हॅंडसेट ट्रेसिंग केल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागला. त्यानुसार पोलिसांनी बुलडाणा येथून आरोपी भालेराव याला अटक केली. यातील काही मोबाइलची विक्री केली होती. विक्री केलेले मोबाईल ट्रेसिंग केल्यानंतर आरोपीचा शोध लागला. या गुन्ह्यात सहा ते सात हजारांपासून पंधरा ते सोळा हजार रुपये किमतीचे पस्तीस मोबाईल असा सुमारे 4 लाख 55 हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, गुन्हे निरीक्षक अशोक कदम, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष दराडे, पोलीस कर्मचारी किसन भारमल, राजेंद्र गायकवाड, विष्णू सरवदे यांच्या पथकाने केला. अटक आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष दराडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)