मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालय, सुरक्षा, आरोग्य आणि वर्किंग कण्डिशन यासाठी हेल्थ ऍण्ड वर्किंग कण्डिशन कोड बिलाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कायद्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दर वर्षी आरोग्य तपासणी करावी लागेल. यात तुमच्यावर अवलंबून असलेल्या आजी-आजोबांनाही ही सुविधा मिळणार आहे. कंपनीत मुलांसाठी पाळणाघरं, कॅंटिन यांचीही सोय असेल. ठराविक वयानंतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोफत होईल.

केंद्रीय मंत्रीमंडाळाने घेतलेला निर्णय हा सर्वच कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. या निर्णयात ऑफिसमध्ये महिलांसाठी कामाची वेळ सकाळी 6 पासून 7 वाजेपर्यंतच ठेवावी लागेल. 7 वाजल्यानंतर महिला काम करत असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपनीची असेल ओव्हरटाइमसाठी अगोदर कर्मचाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. महिन्यात जास्तीत जास्त ओव्हरटाइम 100 तासांऐवजी 125 तास असतील. कुटुंबाची व्याख्या बदललून त्याचा परिघ वाढवला. आजी-आजोबांना मिळणारी सुविधा आता तुमच्यावर अवलंबून असलेल्या आजी-आजोबांनाही मिळणार आहे. त्यांनाही यात सामावून घेतलं गेलंय. कंपनीत मुलांसाठी पाळणाघरं, कॅंटिन या सुविधा असतील. तसेच ठराविक वयानंतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)