मोदी सरकारकडे दाखवण्यासारखे काहीही नाही: शशी थरूर  

अच्छे दिनची घोषणाही ठरली वल्गना
नवी दिल्ली: मोठमोठी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला गेल्या चार वर्षात देशाच्या हितासाठी काहीही करता आलेले नाही. त्यांनी केवळ वल्गनाच केल्या आहेत. त्यांची अच्छे दिन येतील ही घोषणाही एक वल्गनाच ठरली आहे असा आरोप कॉंग्रेसचे केरळातील खासदार शशी थरूर यांनी केला आहे.
सरकारच्या फसलेल्या घोषणांची माहिती आम्ही जनतेपुढे मांडणार आहोत असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की सन 2014 पुर्वी देशात जी स्थिती होती त्यात गेल्या चार वर्षात काही फरक पडला आहे असे तुम्हाला वाटते काय असा प्रश्‍न जर सामान्य लोकांना विचारला तर सगळ्यांचीच उत्तरे नाही अशीच येतील. त्यांनी सन 2014 च्या निवडणुकीत देशातील जनतेला अच्छे दिन आणू असे आश्‍वासन देणारी घोषणा केली होती. ती लोकप्रिय ठरली होती. पण प्रत्यक्षात लोकांच्या पदरात काहीच पडले नाही. मोदी सरकारला एकाही क्षेत्रात वेगळे काम करून दाखवता आले नाही. त्यांची विदेश नितीही साफ अपयशी ठरली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व आता उजळून निघाले असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की त्यांनी लोकसभेत अविश्‍वासस ठरावावर जे भाषण केले त्यातून त्यांची बदलेली प्रतिमा दिसली असे ते म्हणाले. सर्व समावेशक राजकारणच देशाच्या हिताचे आहे पण भाजपने मात्र हिंसा आणि विद्वेष पसरवण्याचेच काम केले आहे असेही त्यांनी नमूद केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)