मोदी लाटेवर कर्नाटक जिंकू – येडियुरप्पांचा दावा

शिकारपुरा – कर्नाटकात मोदी लाट कायम असून या लाटेवर आम्ही कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकू असा दावा भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. आम्हाला येथे पुर्ण बहुमत मिळणार असल्याने सध्या तरी आम्हाला संयुक्त जनता दलाच्या मदतीची गरज पडणार नाहीं असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या विधानातील सध्या तरी या शब्दाला महत्व आहे, कारण याचा अर्थ निवडणुकीनंतर संयुक्त जनता दलाची मदत घेणारच नाही असे मात्र त्यांनी म्हटलेले नाही. सध्या कर्नाटकात त्रिशंकु स्थिती निर्माण झाली तर भाजप-संयुक्त जनता दल एकत्र येऊन सरकार स्थापन करतील अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

सध्या कर्नाटकात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचा विषय गाजतो आहे. स्वत: येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. त्यांनी भाजप मधून फूटून वेगळा पक्ष स्थापन केला होता त्यावेळी त्यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला पाहिजे असा जोरदार आग्रह धरला होता. पण आता भाजपचा या मागणीला विरोध आहे. त्यामुळे येडियुरप्पांची अडचण झाली असली तरी या मुद्‌द्‌याचा निवडणूक निकालावर काहीं परिणाम होणार नाहीं असे त्यांनी म्हटले आहे. हा मुद्दा कॉंग्रेसवरच उलटेल असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्नाटकात लिंगायत समाजाच्या मतदारांचे प्रमाण एकूण मतदारांच्या 17 टक्के आहे. त्यामुळे या समाजाचा ज्या पक्षाला पाठिंबा मिळेल त्यांना राज्यात सरकार स्थापन करण्याचा मार्ग सुकर होईल असे सांगितले जात आहे. कर्नाटकात विधानसभेच्या किमान 150 जागा जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)