मोदी ब्राझीलमध्ये

ब्रासिलीया (ब्राझील) : ब्रिक्‍स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मादी बुधवारी येथे दाखल झाले. ब्राझिल, भारत, रशिया, चिन आणि दक्षिण अफ्रिका या देशांमधील संबंध अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीकोनातून या बैठकीत चर्चा होईल.

ब्रिक्‍सच्या 11 व्या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर मोदी हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याश द्वीपक्षीय संबंधाबाबत चर्चा करतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॅदमिर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्याशी स्वतंत्र चर्चा करतील. उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक उन्नती या संकल्पनेवर ही परिषद आधारीत असून ब्रिक्‍स देशातील सहकार्य वाढवण्यासाठी या देशांच्या नेत्यांशी कल्पनांची देवाण घेवाण करू, असे मोदी यांनी जाण्यापुर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मोदी हे सहाव्यांदा ब्रिक्‍स परिषदेत सहभागी होत आहेत.

ब्रिक्‍स बिझनेस फोरमच्या सांगता समारंभात मोदी सहभागी होतील. सध्याच्या जगातील राष्ट्रीय सार्वभौमत्वापुढील आव्हानांवर अखेरच्या सत्रात चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच या परिषदेत ब्रिक्‍स सांमजस्य करारारवर स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे. सहभागी नेते या परिषदेचे फलित परिषदेनंतर जाहीर करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here