मोदी चित्रपटावरील बंदी आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत बंदी घातली आहे. त्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर 15 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

या चित्रपटाविषयी निवडणूक आयोगच निर्णय घेईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या आधी कॉंग्रेसच्या एका याचिकेवर घेतला होता व त्यांची या चित्रपटाला स्थगीती द्यावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. या चित्रपटाला कॉंग्रेसने याचिका दाखल करे पर्यंत सेन्सार बोर्डाने अनुमती दिली नव्हती त्यामुळे त्यावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही यावर निवडणूक आयोगानेच निर्णय घ्यावा अशी भूमिका सुप्रिम कोर्टाने घेतली होती. बुधवारी सेन्सार बोर्डाने या चित्रपटाला अनुमतीचे सर्टिफिकेट दिले. लगेच त्यावर कॉंग्रेसने निवडणूक आयोगामार्फत बंदी आदेश मिळवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.