मोदी आणि शी जिनपिंग चर्चेमुळे पाकिस्तानला झटका

भारत चीन मिळून अफगाणिस्तानात राबवणार आर्थिक प्रकल्प

वुहान – चीनच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अफगाणिस्तानमध्ये संयुक्‍तपणे आर्थिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या चर्चेदरम्यान कोणताही करार झाला नसला तरी चीन आणि भारताने मिळून “इंडिया चायना इकोनॉमिक कोरिडॉर’अंतर्गत अफगाणिस्तानमध्ये आर्थिक प्रकल्प राबवण्याच्या विषयावर मात्र एकमत झाले आहे. भारत आणि चीनमध्ये या विषयावर एकमत होणे ही पाकिस्तानसाठी चिंतेची बाब ठरू शकते. अफगाणिस्तानच्या बाबतीत भारताचा पुढाकार पाकिस्तानला नको आहे. तेथे पाकिस्तानचा समर्थक चीनने भारताला या आर्थिक प्रकल्पांसाठी तयार केल्यामुळे पाकिस्तानची कोंडी होण्याची शक्‍यता आहे. तसेच दोन्ही देशांमधील विश्‍वासार्हता वाढवण्यासाठी आपपल्या लष्करांना संरक्षणसज्जतेविषयी सोचना देण्याचे मान्य केले आहे.डोकलाम सारखी स्थिती भविष्यात पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन दिवसांच्या शिखर परिषदेदरम्यान जिनपिंग यांच्याबरोबर मोदी यांची सहावेळा चर्चा झाली. भारत चीन सहकार्यविषयक विविध मुद्दयांवर चर्चा झाल्याचे मोदी यांनी सांगितले. आर्थिक संबंध दृढ करण्याबरोबरच, नागरिकांचे परस्परांशी संबंधांबाबतही चर्चा झाली. याशिवाय कृषी, तंत्रज्ञान, उर्जा आणि पर्यटनाविषयीही चर्चा झाल्याचे मोदी म्हणाले.

द्विपक्षीय संबंधांमधील विकास आणि संबंधांचे व्यापक हित लक्षात घेऊन भारत आणि चीनदरम्यानच्या सीमाभागात शांतता आणि सौहार्द राखण्यावर मोदी आणि जिनपिंग यांनी भर दिला. सीमेवरील व्यवहारासंदर्भात दोन्ही देशातील सैन्य दलांनी परस्परातील विश्वास दृढ करण्यासाठी संपर्क मजबूत करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी आपापल्या सैन्याला महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. दोन्ही बाजूंमधे आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी परस्पर आणि समान सुरक्षेचा स्वीकार करण्याबाबतही एकवाक्‍यता झाली. तसेच सीमा भागातील घटना टाळण्यासाठी माहितीची देवाण-घेवाण करण्याची सध्याची यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात आला, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दोन दिवसांच्या अनौपचारिक शिखर बैठकीनंतर सांगितले.

समान रुची असणाऱ्या सर्व मुद्यांबाबत, परस्पर संवाद मजबूत करण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.
चर्चेदरम्यान मोदी यांनी व्यापाराचे समतोल, कृषी उत्पादने आणि औषधांची चीनला निर्यातीच्या महत्वाचा उल्लेख केला. तर भारत आणि चीनमधील संबंध स्थिर आणि विकासावर आधारित परस्परांमधील विश्‍वासावर शी जिनपिंग यांनी भर दिला.

भारत आणि चीन हे दोन्ही चांगले शेजारी आणि मित्र असायला हवेत. जागतिक सामर्थ्यातील बदलते सक्रिय घटक म्हणून दोन्ही देशांनी एकमेकांना आदर द्यायला हवा. सकारात्मक, खुली आणि सर्वसमावेशक वृत्ती स्वीकारायला हवी, तसेच एकमेकांच्या हेतूंचे योग्य विश्‍लेषण करायला हवे. दोन्ही देशांनी परस्परांना सर्वांगीण सहकार्यासाठी एकत्रित काम करायलाच हवे. त्यासाठी संरक्षण संबंधी संवाद, परस्परांशी संबंधित महत्वाच्या विषयांवर ठराविक काळानंतर चर्चा, द्विपक्षीय विकासाच्या मुद्दयांबाबत सर्वसाधारण दिशानिर्देश असणेही गरजेचे आहे. मतभेदांना अधिक समंजसपणे हाताळले जायला हवे, आंतरराष्ट्रीय आणि विभागीय घडामोडींसंदर्भात समन्वय आणि सहकार्य सक्षमीकरण व्हायला हवे आणि विभागीय आर्थिक एकीकरण व आंतरसंलग्नता जोपासली पाहिजे, असा निष्कर्शही या चर्चेत निघाल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले मोदी आणि शी जिनपिंग ह्यांच्या भेटीमुळे पाकिस्तानला झटका बसला कि नाही हा संशोधनाचा विषय ठरावा परंतु ह्या भारतीय समस्त मंत्र्यांचे वरचेवर होणारे प्रदेश दवारे ह्यावर होणारा खर्च वेळेचा अपव्य देशातील अंतर्गत प्रश्नावर दुर्लक्ष ह्यामुळे देशातील जनतेला बसणारा फटका ह्याचा गांभीर्याने कोणीच विचार करीत नाही असे का ? ह्यावर होणारा खर्च हा सर्वसामान्यांच्या पैशावरूच होत असतोना ? एव्हडे करूनही अशा डावरयांचे निष्पन्न काय ? ह्याचा लेखाजोखा सरवर्सामान्यांना कळावयास हवा कि नको ? इतक्या कमी वेळात जास्तीतजास्त परदेश डावरे करणारे आपल्या देशातील पंतप्रधान मधील मोदी हे एकमेव असावेत ह्याचा भाव वाढीवर परिणाम होत नाही का ? कि ह्या होणाऱ्या भाव वाढीतून मंत्र्यांच्या परदेश डावरयांचा खर्च वसूल तर करण्यात येत नाही ? तसे असेल तर अशा प्रदेश डावरयांवर निर्भानध असावयास हवा पण मांजर्याच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)