मोदीजी, कहा है चौकीदार? की चौकीदारही चोर है? – धनंजय मुंडे

रायगड: महाड येथे चवदार तळ्याचे घेऊन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्चन यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ झाला. महाड य़ेथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सरकारविरोधात टीकेची तोफ डागत आता परिवर्तन होणारच हा नारा दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी परिवर्तनासाठी रायगडाची निवड केली त्याच रायगडावरून भाजपाचे जुलमी सरकार घालवण्यासाठी परिवर्तनाला सुरवात होत आहे. मागील साडेचार वर्षात भाजप सरकारने पदोपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. शिवस्मारकाची अजून एकही वीट ठेवली गेली नाही. शिवाजी महाराज यांच्या नावे कर्जमाफी जाहीर केली मात्र शेतकऱ्यांना मदत काही मिळाली नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे. त्यामुळे छत्रपतींचा महाराष्ट्र हे कदापी खपवून घेणार नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर देखील टीका केली. मोदी काल सोलापुरात होते. ते म्हणाले की, चौकीदार देशाचे संरक्षण करेल. मोदी यांच्या मागेच दोन मंत्री बसले होते ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे पैसे खाल्ले. मोदीजी, कहा है चौकीदार? की चौकीदारही चोर है? जे सरकार सर्वसामान्यांसाठी नाही ते उखडून टाका. असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.

भाजप सेने युतीवर टीका करताना मुंडे म्हणाले, आज हे विकासाच्या नावावर मतं मागत नाही. भाजपने शिवसेनेची धार घालवली. युती गेली खड्ड्यात असं उद्धव ठाकरे स्वत:च एका भाषणात म्हणाले. खरयं, महाराष्ट्राची जनता आता युतीला खड्ड्यात टाकल्याशिवाय राहणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)