मोदींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून रासायनिक हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. काशीनाथ मंडल (वय 22) असे त्याचे नाव आहे. काशीनाथने शुक्रवारी नॅशनल सिक्‍युरीटी गार्डच्या (एनएसजी) दिल्लीतील नियंत्रण कक्षाला दूरध्वनी कॉल करून हल्ल्याची धमकी दिली.

एनएसजीने धमकीची गंभीर दखल घेऊन संबंधित दूूरध्वनी क्रमांक ट्रॅक केला. त्यानंतर मुंबई पोलिसांना त्यासंदर्भात कळवण्यात आल्यावर काशीनाथला मुंबईतील रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. त्यावेळी तो सुरतला निघालेल्या रेल्वेगाडीत बसण्याच्या तयारीत होता. मूळचा झारखंडचा रहिवासी असणारा काशीनाथ मुंबईत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याचा एक मित्र झारखंडमधील नक्षली हल्ल्यात मृत्युमुखी पडला. त्यासंदर्भात त्याला मोदींची भेट घ्यायची होती, अशी माहिती चौकशीतून पुढे आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)