मोदींच्या हस्ते पराक्रम पर्व प्रदर्शनाचे उद्‌घाटन

सर्जिकल स्ट्राईकच्या जागवल्या स्मृती
जोधपुर – भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसुन जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्या दुसऱ्या स्मृती वर्षानिमीत्त येथील लष्करी केंद्रात पराक्रम पर्व नावाचे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

यावेळी मोदींनी सीमेवरील संघर्षात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून या प्रदर्शनाची पहाणी केली. यात भारतीय लष्कराच्या क्षमतेचे यथार्थ दर्शन घडवण्यात आले आहे. कोनार्क युद्धस्मारकावर जाऊन त्यांनी शहीदांच्या स्मृतीलाही पुष्पांजली अर्पण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी त्यांच्या समवेत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन याहीं उपस्थित होत्या. 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरात जाऊन तेथील सात दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यात पाकिस्तानी बाजूचे व दहशतवद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याच्या निमीत्ताने भारतीय लष्कराने जे अतुलनीय शौर्य गाजवले त्याच्या स्मृती जागवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या अवधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन त्याचाच एक भाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)