मोदींच्या व्यासपीठावर अमरसिंहांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

लखनौ – समाजवादी पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते अमरसिंह हे उत्तरप्रदेशातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तरप्रदेशातील 60 हजार रूपये गुंतवणुकीच्या 81 प्रकल्पांचे उद्‌घाटन मोदींच्या हस्ते झाले त्यावेळी अमरसिंह तेथे उपस्थित होते.

त्यांच्या उपस्थितीची नोंद स्वता मोदी यांनी भाषणातही घेतली. उद्योगपती हे चोर किंवा लुटारू नाहीत. असे वाक्‍य उच्चचारल्यानंतर त्यांनी अमरसिंह यांचीही रूजवात घातली. मोदींच्या या कार्यक्रमानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी राज्यातील दोन इलेक्‍ट्रीक बसेसनाही हिरवा झेंडा दाखवला त्या कार्यक्रमालाही अमरसिंह उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमांच्या आधी 23 जुलैला अमरसिंह यांनी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची भेट घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेव्हापासूनच अमरसिंह हे भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जाऊ लागली आहे. मला स्वताला भाजप मध्ये प्रवेश करण्यात काही अडचण नाही पण मला अजून त्या पक्षाकडून निमंत्रणच मिळालेले नाही असे त्यांनी स्वताच एका मुलाखतीच्यावेळी नमूद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)