मोदींच्या जीवनावर चित्रपट साकारणार, संजय लीला भन्साळींची घोषणा

मुंबई – मे महिन्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता विवेक ओबेरॉयने या चित्रपटात मोदींची भूमिका साकारली होती. मात्र, आता बॉलीवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मोदींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. बाहुबली अभिनेता प्रभास हा या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त प्रभास या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर लाँच करणार आहे.

‘मन बैरागी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट आपल्यासाठी खूप खास असल्याचे संजय लीला भन्साळी यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ एकाच तासाचा असणार आहे. हा चित्रपट बनवण्याचा उद्देश म्हणजे, मोदींचे आयुष्य हे सार्वभौमिक अपिल आणि एक विशेष संदेश देणारे आहे. त्यामुळे हा चित्रपट तयार करणार असल्याचे भन्साळींनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)