मोदींचा चिमटा काढत राज ठाकरेंच्या डॉ. मनमोहन सिंग यांना हटके शुभेच्छा !

मुंबई: आज भारताचे माजी पंप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा वाढदिवस त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चिमटा काढत शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरे नेहमी राजकीय नेत्यांवर टिका करत असतात. दरम्यान, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे ?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“देशाला आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर यशस्वीपणे नेणारे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या आज वाढदिवस. 1991 नंतरच्या आर्थिक उदारीकरणाची फळं ज्यांनी चाखली, त्याच वर्गाने डॉ. मनमोहन सिंग ह्यांची निर्भत्सना करण्यात काही काळ पुढाकार घेतला होता. पण, देशाची अर्थव्यवस्था आर्थिक निरक्षरांनी गर्तेत ढकलली असताना, माझ्या सकट, तमाम भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे. अर्थमंत्री असताना असेल किंवा पंतप्रधान असताना असेल, तुम्ही देश ज्या पद्धतीने आर्थिक संकटातून बाहेर काढलात त्याचं महत्व, आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राजकारणात टीका होतच असते, ती कधी काळी आम्ही पण केली. पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याचं औदार्य आमच्याकडे नक्कीच आहे. डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या भाषणातलाच एक संदर्भ घेऊन म्हणेन ” इतिहास तुमच्या कार्याचं आणि योगदानाचं नक्कीच योग्य मूल्यांकन करेल.’

https://twitter.com/RajThackeray/status/1044890918267092992

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)