#Video: मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा….

पुन्हा संसार उभे राहण्यास सुरुवात

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभात वृत्तसेवा
पुणे : मोडला जरी संसार तरी, मोडला नाही कणा..
या कवी कसुमाग्रजाच्या कविते मधील नायका प्रमाणेच आपली सहनशीलता, धैर्य आणि संकटाशी सामना करण्याची झुंजार वृत्ती दाखवित, दांडेकरपूल वसाहती मधील संसार पुन्हा उभे राहू लागले आहेत.

खडकवासला कालव्याला भगदाड पडल्याने या भागातील जवळपास 700 हुन अधिक घरे पाण्यात गेली होती. गुरुवारचा सगळा दिवस पाण्यात घालविण्यानंतर रात्री महापालिका तसेच नातेवाईकांचा पाहुणचार घेऊन या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी पहिल्या सूर्यकिरणा सोबत पुन्हा संसाराच्या उभारणीला सुरुवात केली. चिमुकल्यापासून ते थोरापर्यंत सगळे हात घरातील साहित्य शोधण्यात लागले होते.

आता जे राहीलं ते आपलं… जे वाहून गेले ते गंगा माईच. असं समजून या भागातील नागरिकांनी पुन्हा घर आवरण्यास सुरुवात केली. कोणी घर पुसून घेत होत तर कोणी भिजलेली कागदं वळविण्यासाठी पत्र्यावर उन्हात उभे होते तर कोणी आपापल्या आसपास साठलेल्या सामानात आपलं काही आहे का? हे शोधात होते. सापडलं तर ठीक, नाहीतर पुन्हा नव्याने घेऊ… असा विश्वास देत. एकमेकांना धैर्य दिलं जातं होत. त्यातच या पीडितांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नागरिक नाराज असतानाही त्याच्या नाराजीवर रोष व्यक्त न करता, तेवढ्याच हिरिरीने मदतकार्यात सहभागी झाले होते. त्याची ही काही क्षणचित्रे ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)