मोठा दिलासा : 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी

महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश

मुंबई – राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून वीज दर सुमारे 2 टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात इंधन दरवाढ होत आहे. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.

एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020 मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत सर्व रहिवासी, दुकाने, कंपनी, इंडस्ट्रीसाठी 10 टक्के वीज दर कमी करण्यात आले. या वर्षी 1 एप्रिलपासून संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.