मोटो वन पॉवर भारतात सादर 

नवी दिल्ली: मोटोरोलाकडून मोटो वन पॉवर हा दणदणीत बॅटरी क्षमता असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला. 5 हजार एमएएच बॅटरी क्षमता असून ऍन्ड्रॉईड वन ही ऑपरेटिंग प्रणाली आहे. नॉचचा वापर करण्यात आलेला हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून सोमवारपासून त्याची नोंदणी सुरू झाली. 5 ऑक्‍टोबरपासून विक्रीस प्रारंभ होणार आहे.
भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये असून 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 4 जीबी रॅम या एकाच प्रकारात उपलब्ध होईल. 256 जीबीपर्यंत अतिरिक्त स्टोरेज क्षमता वाढविता येण्यासह, ब्लुटुथ 5.0, युएसबी टाईप सी, 4जी एलटीई यांचा समावेश आहे. मोटोरोलाला मंगळवारी 90 वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने गुगलच्या मदतीने या फोनची निर्मिती करण्यात आली. कंपनी इन्टरनेट ऑफ थिंग्स्‌, क्‍लाऊड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रवेश करणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)