मोटार दरीत कोसळून एक ठार, तीन जखमी

लोणावळा लायन्स पॉईटजवळील घटना

लोणावळा – येथील “आयएनएस शिवाजी’जवळ लोणावळा सहारा (ऍम्बी व्हॅली) रोडवर मोटार दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (दि. 28) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनिष रमेश प्रितमानी (वय 26, रा. सेक्‍टर क्रमांक 19, खारघर, नवी मुंबई, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटार चालकाचे नाव आहे. संतोष आनंद पाटील (वय 29), भक्‍ती अशोक पाटील (वय 20), अमोल नथुराम कुंठे (वय 57, तिघेही रा. खारघर, नवी मुंबई, ठाणे) यांचा समावेश आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष त्याचे साथीदार हे गुरुवारी (दि. 27) रात्री लोणावळ्या जवळील टायगर व लायन्स पॉंईट्‌स येथे त्यांच्या मोटारीने (एम.एच. 46/ए.एक्‍स/3232) फिरायला गेले होते. मध्यरात्रीच्या पर्यटनानंतर ते शुक्रवारी पहाटे दोन अडीचच्या सुमारास ते पुन्हा घरी परतत होते. यादरम्यान लोणावळा-सहारा (ऍम्बी व्हॅली) लायन्स पॉईट्‌स रोडवर “आयएनएस शिवाजी’जवळ असलेल्या एका तीव्र उतारावरील नागमोडी वळणावर चालक मनिष याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले.

मोटार रोडलगतच्या दरीत सुमारे दोनशे अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. यामुळे कार चालक मनिष याचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर झाले आहे. अपघाताची माहिती समजताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला पाचारण केले. त्यांच्या मदतीने दरीत जाऊन अपघातग्रस्त जखमींना मोटारीतून बाहेर काढले. व जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आय. जी. शेख तपास करीत आहेत.

शिवदुर्गच्या रोहित वर्तक, योगेश उंबरे, राजेंद्र कडू, आनंद गावडे, समीर जोशी, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, अशोक उंबरे, प्रवीण देशमुख, महेश मसणे, राजू पाटील, वैष्णवी भांगरे, दिनेश पवार, साहेबराव चव्हाण, अभिजित बोरकर, सुनील गायकवाड यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)