मोटारसायकल चोरट्याला सुनावली न्यायालयीन कोठडी

नारायणगाव- मोटारसायकली आणि भांडी चोरणाऱ्या एका चोरट्याला नारायणगाव पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. चोरट्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यालयीन कोठडी देण्यात आली आहे. बाळू तुकाराम वारे (वय 21, धंदा -मजुरी, रा.पारनेर, जि.अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्याद रुपेश गणपत औटी (रा. खोडद, ता. जुन्नर) यांनी 18 मार्च 2018 ला दिली होती.
खोडद येथून 16 मार्च 2018 ला रुपेश औटी यांच्या घरासमोरून हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच 04 बीजे 5496) आणि काही भांडी चोरीला गेली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.28)ला नारायणगाव पोलीस पेट्रोलिंग करीत असताना बाळू वारे हा संशयितरित्या खोडद परिसरात फिरताना आढळून आला. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच नारायणगाव पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने खोडद येथून 16 मार्च 2018 ला हिरो होंडा कंपनीची दुचाकी आणि घरगुती भांडी चोरी केल्याची कबुली दिली. बाळू याच्याकडून मोटारसायकल आणि घरगुती भांडी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)