“मोगेम्बो’चा नातू करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू

बॉलीवूडमधील “मोगेम्बो’ अर्थात दिवंगत दिग्गज अभिनेता अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी लवकरच चित्रपटसृष्टीत पर्दापण करत आहे. तो “पागल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत वर्धनने नुकतीच माहिती देत आपल्या आजोबांच्या आठवणी सांगितल्या.

वर्धनची प्रारंभीपासूनच अभिनय क्षेत्रात कारर्किद करण्यासाठी इच्छा होती. चित्रपटसृष्टीत पाउल ठेवण्याबाबत तो म्हणाला, मी पाच वर्षांचा असल्यापासून एक कलाकार आणि घरातील एंटरटेनटर म्हणून ओळखला जात होतो. मी सुटीच्या दिवशी किंवा निवांत वेळी आजोबांचे विंग आणि बूट घालून संपूर्ण घरात गोंधळ घालत आणि त्यांचे डायलॉग म्हणत असे. तेव्हा माझया घरातील सदस्यांना मी एक अभिनेता बनू शकतो, याची जाणीव झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझी बहिण सांची, तिचे मित्र आणि घरातील काम करणारे लोक हे माझे प्रेक्षक असत. चित्रपटसृष्टीतील पर्दापणाबाबत सांगायचे म्हटले तर मी एक जुना चित्रपट करू इच्छित होतो. मात्र, “पागल’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी हा चित्रपट साईन केला.

दरम्यान, वर्धनने थियटर आर्टिस्ट म्हणूनही काम केले आहे. याशिवाय त्याने अनेक चित्रपटांत असिस्टेंट डायरेक्‍स्टरची जबाबदारी पार पाडलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)