“मोक्‍का’तील फरार आरोपी अखेर जेरबंद

पिंपरी  – गेल्या दीड वर्षापासून फरार असलेल्या “मोक्‍का’मधील आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीला पोलिसांनी अहमदनगर येथे जाऊन सापळा रचून अटक केली आहे. सचिन आसाराम शहाणे (रा. श्रीरामपूर, अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाणे याच्यावर सोनसाखळी चोरी तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होते. मात्र तो गेल्या दीड वर्षांपासून फरार होता.

युनिट दोनचे पोलीस नाईक नितीन बहिरट यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी हा अहमदनगर येथील श्रीरामपूर येथील अशोकनगर परिसरात राहत आहे. त्यानुसार पोलीम माग काढत तेथे गेले व त्यांनी परिसरात जाऊन तपास केला. हा तोच आरोपी असल्याची खात्री पटताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याच प्रत्यन केला. यावेळी सचिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली. त्याला पुढील तपासासाठी तळेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सचिनवर मोका लावण्यात आला होता. चेन स्नॅचिंगसह इतरही काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला हा आरोपी सध्या फरार होता.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, महोम्मद गौस नदाफ, मयूर वाडकर, प्रविण दळे, तुषार शेटे, हजरत पठाण, संजय गवारे, धर्मराज आवटे, संपत निकम, संदीप ठाकरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.