मोई येथे दगडखाणीतील पाण्यात युवक बुडाला

महाळुंगे इंगळे-मोई (ता. खेड) येथील दगड खाणीतील पाण्यात आपल्या मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेला अकरावीत शिक्षण घेणारा महाविद्यालयीन युवक बुडाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 3) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला. पिंपरी – चिंचवड महापालिकेतील अग्निशमन दल व मोई गावातील पोहणाऱ्या स्थानिक तरुणांनी रात्री उशिरा पर्यंत सबंधित युवकाचा शोध घेण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.

गौतम सुधीर निटूर (वय 17, रा. मोशी, ता. हवेली) असे पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. खेड तालुक्‍यातील मोई येथील उद्योगनगरमध्ये दगडखाण असून, या दगड खाणीतील पाण्यात शुक्रवारी (दि. 3) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान स्पाइन सिटी मोशी येथील एकूण पाच जण युवक पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी गौतम हा पाण्यात पोहताना दमछाक होऊन बुडाला. त्याने नुकतीच अकरावीची परीक्षा देऊन तो बारावीमध्ये गेला होता. तो बुडाल्याचे समजताच पिंपरी – चिंचवड महापालिकेतील अग्निशमन दल व स्थानिक युवकांनी पाण्यात पोहून गौतम याचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे. रात्री उशिरा पर्यंत त्याचा शोध लागला नसल्याचे शोध पथकाने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.