मॉलच्या स्टोअर रूममध्ये तासभर अडकून पडली सनी लिओन

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओन अलिकडे एका मॉलच्या स्टोअर रूममध्ये तब्बल एक तासभर अडकून पडली होती. सनीबरोबर तिचा नवरा डॅनिएल बेवर आणि डिजायनर रियाझ गांजी हे पण स्टोअर रूममध्ये अडकून पडले होते. एका क्‍लोदिंग ब्रॅन्डच्या स्टोअरच्या ओपनिंगला सनी गेली असताना हा प्रकार घडला. ती तिथे येणार ह्ये समजल्यावर पब्लिकने प्रचंड गर्दी केली होती.

गर्दीमध्ये धक्काबुक्की व्हायला लागली. सनीची एक झलक पाहण्यासाठी जमा झालेल्या चाहत्यांच्या या गर्दीला आवरणे खूप कठिण झाले होते. अखेर सनी, डॅनिएल आणि रियाझ गांजी यांना स्टोअर रूममध्ये जाऊन शटर ओढून घ्यावे लागले. पण शटर ओढताना खूप घाई झाली आणि शटर आपोआप लॉक झाले. मॉलचे सगळेच दरवाजे असे ऍटोमॅटिक लॉक होत असतात. या लॉक झालेल्या दरवाजाला उघडण्यासाठी अख्ख्या मॉलचे लाईट बंद करून रिसेट करावे लागले. ही सगळी धडपड करण्यात एक तासापेक्षा अधिक वेळ लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेवढा वेळ सनी लिओन स्टोअर रूममध्ये अडकूनच राहिली. या प्रकाराने सनी अगदी वैतागली. शटर उघडताच कोणाशीही न बोलता ती तडक गाडीमध्ये जाऊन बसली आणि तिथून निघून गेली. तिच्या फॅन्सची प्रचंड गर्दी होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)