मॉडर्नच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती जाहीर

निगडी-यमुनानगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कुल मधील चार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दुर्बल घटक परीक्षेत शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. मोहिनी जाधव ,समृद्धी काकडे, ऋषिकेश कासले आणि सुजल पाटील या विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे.

केंद्र शासनाच्या बाराव्या नियोजन आयोगानुसार समाजातील आर्थिक दुर्बल घटकात समावेश असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना केंद्रशासनाकडून सलग चार वर्षे प्रत्येकी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या परिक्षेसाठी वर्षभर केलेला भरपूर सराव , शिक्षकांचे मार्गदर्शन हे यशाचे कारण असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आशा कुंजीर , श्रीकृष्ण निकम शिक्षकांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य सतीश गवळी ,पर्यवेक्षिका सुमती पाटसकर,शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार ,संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे ,सहकार्यवाह प्रा.जोत्स्ना एकबोटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)