मॉडर्नच्या विद्यार्थ्यांची भारतीय जवानांस पत्ररूपी राखी

निगडी – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल निगडीच्या 1200 विद्यार्थ्यांनी सीमेवरील भारतीय जवानांशी पत्ररुपी संवाद साधण्यासाठी 2000 लिखित पत्रे पाठवून कृतज्ञता व्यक्‍त केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सीमेवर तैनात जवानांना आजच्या विकसित तंत्रज्ञान युगात पोस्टाचे पत्र लिहून एक अभिनव उपक्रम राबवला. सीमेवरील जवानांच्या अहोरात्र परिश्रमामुळे आपण सर्वजण सुरक्षित असतो, याची विद्यार्थ्यांना जाणीव आहे. या विषयी कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा पत्ररूपी संवाद साधला. पालकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जाणवत होता. यासाठी सर्व शिक्षकांनी मुलांना प्रेरित केले. प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमाचे कौतुक शाला समिती अध्यक्ष शरद इनामदार यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, राजीव कुटे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)