मैथिली बापट, सावनी गोगटे शास्त्रीय संगीत विभागात प्रथम

संगीत भूषण पं. राम मराठे स्मृती संगीत स्पर्धा

तळेगाव दाभाडे – येथील श्रीरंग कलानिकेतनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत भूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धांची अंतिम फेरी हेरिटेज आर्ट ऍण्ड म्युझिक केडमीच्या निसर्गमयी वातावरणात संपन्न झाला. स्पर्धेचा आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांचे हस्ते झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वर्षी प्रथमच प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून 201 स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये शास्त्रीय कंठ गायन, सुगमसंगीत गायन, नाट्यगीत गायन तसेच तबला-पखवाज संवादिनी, वादन असे विविध प्रकार आणि विविध वयोगटही स्पर्धक होते.

पुणे, नांदेड, नगर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, माजलगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, बोरीवली, ठाणे, तळेगाव या ठिकाणाहून निवड झालेल्या कलाकारांचे गायन, वादन ऐकण्याची संधी तळेगावकर रसिकांना मिळाली.
स्पर्धेचा निकाल : शास्त्रीय कंठ संगीत लहान गट : प्रथम – मैथिली बापट, द्वितीय – आर्या धारेश्‍वर, तृतीय – कनई निमिषे.

शास्त्रीय कंठ संगीत खुला गट : प्रथम – सावनी गोगटे, द्वितीय – प्राजक्‍ता बराटे, तृतीय – प्रियांका भिसे.
नाट्य संगीत लहान गट (10 ते 17) : प्रथम – मैथिली बापट, द्वितीय – आदित्य पंडित, तृतीय – आदि भरतीया.
नाट्य संगीत मोठा गट (वय 17 ते 40) : प्रथम- सृष्टी कुलकर्णी, द्वितीय-अनुश्री दातार, तृतीय- स्वामिनी मुणगेकर.
नाट्य संगीत प्रौढ गट : प्रथम – तपन वागळे

सुगम संगीत लहान गट : प्रथम – जुई देशपांडे, द्वितीय – जाई परांजपे, तृतीय- श्रुती वैद्य.
सुगम संगीत युवा गट : प्रथम – मालविका दीक्षित, द्वितीय – सावनी परगी, तृतीय – मिता दांडेकर.
सुगम संगीत खुला गट : प्रथम – निशा दीक्षित, द्वितीय – भक्‍ती बेळगीकर, तृतीय- प्रिया कुलकर्णी.
सुगम संगीत प्रौढ गट : प्रथम – तपन वागळे, द्वितीय – उल्हास भानू, तृतीय – मेधा मेहेंदळे.
संवादिनी वादन लहान गट : प्रथम- कल्पतरू ठाकरे, द्वितीय- पूर्वा खरे, तृतीय – आदित्य उदार.
संवादिनी वादन खुला गट : प्रथम – अमेय बिच्चू , द्वितीय – अथर्व कुलकर्णी, तृतीय – चैतन्य पानसे,
तबला वादन लहान गट : प्रथम- महेश मरळ , द्वितीय- ओंकार भांडवलकर, तृतीय- आर्यन कुलकर्णी.
तबला वादन खुला गट : प्रथम- रिनल विठानी, द्वितीय- ऋचा तिवारी, तृतीय- अथर्व गिजरे.
पखवाज वादन लहान गट : प्रथम – कृणाल चौधरी, द्वितीय- सौरभ चोरमले.

पखवाज वादन खुला गट : प्रथम- नितेश गावडे, द्वितीय- सागर गुरव, तृतीय- देवदत्त घोगळे. सन्माननीय शेखर कुंभोजकर, डॉ. महावीर बागवडे, सोनाली सरदेशपांडे, अस्मिता फाटक, मुकूंद पंडित, ललिता जोशी, हेमंत आठवले, जयंत साने, श्रीपाद भावे, धनंजय पंडित आणि डॉ. सतीश वैद्य यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेसाठी केदार कुलकर्णी, निलेश शिंदे, विष्णू कुलकर्णी आणि अनिरुद्ध पंडित यांनी तबला साथ केली, तर संपदा थिटे, शुभदा आठवले, जयंत साने आणि नचिकेत हरिदास यांनी संवादिनी साथ केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनात शरद जोशी, दिपक आपटे, दीप्ती आपटे, लक्ष्मीकांत घोंगडे, जयंत पटवर्धन, विलास रानडे, सीमा आवटे, बागेश्री लोणकर, कांचन सावंत, सुचेता बिचे, राजीव कुमठेकर, विश्‍वास देशपांडे, अनिरुद्ध जोशी, कुशल राजे, ऋतुजा शिंदे, अनिल शिरसाट, संजय डंबे, श्रीकांत चेपे, विलास सुतार आणि विनय कशेळकर यांचा महत्वाचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)