मेहुल चोक्‍सीसह 28 भारतीयांचे अँटिग्वाच्या नागरिकत्वासाठी अर्ज

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळालेल्या मेहुल चोक्‍सीला अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवल्याची माहिती समोर आल्यानंतर 28 भारतीय नागरिकांनी या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केल्याचे उघड झाले आहे. 2014 पासून काही भारतीयांना अँटिग्वाने नागरिकत्व दिले असा आरोप होत असून आता विरोधकांनी अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धरला आहे.

अँटिग्वामध्ये कोणत्याही परदेशी नागरिकाला दुहेरी नागरिकत्व बहाल करण्यात येते. नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांना राष्ट्रीय विकास फंड (एनडीएफ) मध्ये सरकारद्वारा मंजूर केलेल्या रियल इस्टेट किंवा सरकारकडून मंजुरी मिळालेल्या व्यापारात गुंतवणूक करावी लागते. अँटिग्वाचा पासपोर्ट मिळाल्यास त्या व्यक्तीला 132 देशांत व्हिसाविना प्रवास करण्यास मुभा मिळते. तसेच त्याच्यावर काही आरोप असल्यास त्याचे प्रत्यार्पण केले जात नाही. म्हणून या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी गर्दी असते. 7 भारतीयांना अँटिग्वाचे नागरिकत्व दिल्याची माहिती समोर आली असली तरी उर्वरित लोकांची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केवळ 2 लाख डॉलर भरणाऱ्या 28 पैकी 7 नागरिकांना 1 जानेवारी 2017 ते 30 जून 2017 या काळात नागरिकत्व मिळाले आहे. अँटिग्वाने आपल्या देशात गुंतवणूक वाढावी यासाठी सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अशी योजना सुरु केली आहे. अँटिग्वाला मदत करा, गुंतवणूक करा आणि दुहेरी नागरिकत्व मिळवा अशी ती योजना आहे.

एकूण 1121 परदेशी लोकांनी येथील नागरिकत्व मिळवले असून त्यामध्ये 2.5 टक्के भारतीय आहेत. यात चीनी नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. 2014 पासून कॅरेबियन देशांमध्ये 478 चीनी नागरिकांनी नागरिकत्व घेतले आहे. तसेच त्यात 42 बांगलादेशी व 25 पाकिस्तानी लोकांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)