मेहुल चोक्‍सीला अँटिगुआचे नागरीकत्व?

नवी दिल्ली – भारतातील बॅंकेला हजारो कोटी रूपयांना चुना लाऊन विदेशात फरारी झालेला मेहुल चोक्‍सी हा सध्या अँटिगुआत दाखल झाला असल्याची माहिती अमेरिकेन भारतीय तपास यंत्रणांना पुरवली होती. तथापी आता त्याला त्या देशाने त्यांचे नागरीकत्वही दिल्याची माहिती पुढे येत आहे. त्या देशात कोणत्याही व्यक्तीला 1 कोटी 30 लाख ते 1 कोटी 70 लाख रूपयांपर्यंतची रक्कम दिल्यास त्या देशाचे नागरीकत्व व पासपोर्ट जारी केला जातो त्याचा आधार घेऊन तो त्या देशाचा नागरीक झाला असल्यानेच त्याला त्यांचा पासपोर्ट मिळाला असावा असा कयास बांधला जात आहे.

त्यामुळे त्याला आता उजळ माथ्याने जगात कोठेही फिरणे शक्‍य होणार आहे अशी माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगण्यात येते. नोव्हंबर 2017 मध्येच त्याने अँटिगुआचे नागरीकत्व मिळवल्याची माहितीही पुढे येत आहे. मेहुल चोक्‍सी हा नीरव मोदीचा जवळचा नातेवाईक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)