मेळघाटात तिसऱ्या दिवशीही जमावबंदी ; दगडफेकप्रकरणी 5 जण ताब्यात

अमरावती: मेळघाटातील सशस्त्र हल्लाप्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वनविभाग आणि आकोट पोलिसांवर दोन दिवसांपूर्वी काही स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला होता.दरम्यान, अमरावती जिल्हाधिकारी परिसरात आज तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अमरावतीतील मेळघाटच्या जंगलात पुनर्वसित आदिवासी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांत टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. सरकारने पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन अधिकारी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. यावेळी गावकऱ्यांनी सरकारी गाड्यांचीही तोडफोड केली होती. या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून या परिसरात कलम 144 लावण्यात आले होते. सरकारने पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याचा आदिवासी गावकऱ्यांचा आरोप आहे. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई न केल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य वनरक्षक आणि वनपाल संघटनेने दिला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनही दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)