मेन्स फिजिक्‍स बॉडीबिल्डिंगचा कडेगावचा ऋषिकेश पवार ठरला टायटल विनर

कडेगाव – गडहिंग्लज येथे गांधीनगर युथ सर्कलतर्फे घेण्यात आलेल्या भव्य बंटीदा क्‍लासिक पश्‍चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये कडेगाव येथील लिबर्टी फिटनेस जिमचा खेळाडू व मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश पवार यांनी मेन्स फिजिक्‍स बॉडीबिल्डिंगचा टायटल किताब मिळवून प्रथम बक्षीस पटकावले. माजी आमदार संजय घाटगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ऋषिकेश पवार हा कडेगाव तालुक्‍यातील पहिला बॉडीबिल्डर व मेन्स फिजिक्‍सचा खेळाडू आहे.

त्याच्या यशाबद्दल सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, चंद्रसेन देशमुख, धनंजय देशमुख, सोनहिरा संचालक दीपक भोसले, वसंतराव गायकवाड, रवींद्र पालकर, कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, नगरसेवक नितीन शिंदे, कुलदीप दोडके, नगरसेविका अश्विनी वेल्हाळ, शांता घाडगे, सिंधुताई रास्कर, सुनील गाढवे, रजाअली पिरजादे, संतोष कणसे, डी. एस. देशमुख यांनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)