मेड इन इंडियाची दोन इंजिने लष्कराकडे सुपुर्त

चेन्नाई – संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी उच्चशक्तीची बहु इंधनाची दोन मेड इन इंडियाची दोन इंजिने लष्कराकडे सुपुर्त इंडिया इंजिने भारतीय लष्कराकडे सुपुर्त केली. ही इंजिन्स आवडी येथील इंजिन फॅक्‍टरीत निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारच्या मेक ईन इंडिया तत्वावर भारतात ही यंत्रे तयार झाली आहेत. यावेळी फॅक्‍टरीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री सीतारामन यांनी या इंजिनाची कागदपत्रे लष्कराचे उपप्रमुख देवराज अनबु यांच्याकडे सुपुर्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या इंजिनांपैकी एक इंजिन टी 90 भीष्म रणगाड्याला तर दुसरे अजेय रणगाड्याला उपयोगी पडणारे आहे. या इंजिनांचा आराखडा रशियन बनावटीचा असला तरी त्याची निर्मीती भारतात झाली आहे. या इंजिनांची भारतात निर्मीती सुरू झाल्यामुळे भारतीय लष्कराचे दरवर्षी किमान 80 कोटी रूपये वाचवणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)