सातारा: मेडिकल कॉलेजसाठी विना मोबदला कोट्यावधीची जागा

पुनर्मान्यतेसाठी पाठपुरावा करावा लागणार

इंडियन मेडिकल कौन्सिलने 2016 मध्ये राज्यातील मान्यता मिळून ही उभारणी करू न शकलेल्या 6 मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द केली. त्यामध्ये साताऱ्याचा ही समावेश होता. मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी किमान 25 एकर जागेची आवश्‍यकता असते तो प्रश्‍न कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निकालात निघाला आहे. तत्पुर्वी परंतु मागील काही महिन्यांपुर्वी मेडिकल कॉलेजला पुर्नमान्यता मिळावी असा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याने इंडियन मेडिकल कौन्सिलकडे पाठविला आहे. कौन्सिलने मान्यता दिल्याशिवाय कॉलेज उभारणीचे पुढचे पाऊल पडूच शकणार नाही. त्यामुळे आता कॉलेजसाठी जागा मिळाल्याचे श्रेय घेणाऱ्यांनी पुनर्मान्यतेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ना.गिरीष महाजनांकडून जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण खात्याचा सुरेख मेळ

सम्राट गायकवाड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा – मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जलसपंदा व वैद्यकीय शिक्षण खात्याचा कार्यभार असलेले ना.गिरीष महाजन यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. जलसंपदा विभागाने मन मोठे दाखवत कृष्णा खोरे महामंडळाची तब्बल 16 कोटी रूपयांची 25 एकर जागा विना अट व विना मोबदला वैद्यकीय शिक्षण विभागाला दिली आहे. त्याच बरोबर जागेवरील जलसपंदा विभागाच्या इमारतींची 17 कोटी रूपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. ना.महाजन यांच्याकडे असलेल्या दोन्ही खात्यांचा मेळ बसल्याने कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न निकालात निघाला आहे.

आघाडी सरकारने खावली, ता.सातारा येथे मेडिकल कॉलेज उभारणीसाठी मंजुरी दिली होती. मात्र, तत्कालिन कृष्णा खोरे मंत्री व पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी सातारा शहरानजीक कृष्णा खोरेची 50 एकर जागा जागेवर कॉलेज उभारणीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावात वैद्यकीय शिक्षण विभागाने जागेचा व इमारतींचा मोबदला कृष्णाखोरे महामंडळाला देण्यात यावा, असे सूचित केले होते. मात्र, त्यावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत झाले नाही. परिणामी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार कॉलेजची उभारणी वेळेत न झाल्याने सन.2016 मध्ये मान्यता रद्द केली. तद्दनंतर मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न अडगळीत पडला होता. परंतु मागील वर्षी व फेब्रुवारी महिन्यात सातारा दौऱ्यात ना.गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न लवकरच निकालात काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार मेडिकल कॉलेजसाठी किमान 25 एकर जागा आवश्‍यक असते. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 25 एकर जागेचा नकाशा सरकारकडे सादर केला. सुदैवाने जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण खात्याचा कार्यभार गिरीष महाजन यांच्याकडे असल्याने त्यांनी कोणाताही विचार न करता कृष्णा खोरे महामंडळाची जागा वैद्यकीय शिक्षण खात्याकडे सुपुर्द करण्याची तयारी दर्शविल्याने अखेर मेडिकल कॉलेज होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे.

प्रतापसिंहनगरला अच्छे दिन की पर्यायी रस्ता
मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न सुटल्याने बॉम्बे रेस्टॉरंट चौक, वनवासवाडी, पिरवाडी, कृष्णानगर, संगमनगर, प्रतापसिंहनगर परिसराचे मार्केट चांगलेच वाढणार आहे. परंतु मेडिकल कॉलेजसाठी कृष्णाखोरे महामंडळाची दिलेल्या जागेत सातारा- कोरेगाव महामार्गावरून प्रतापसिंहनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. आता ती जागा कृष्णाखोरे ऐवजी वैद्यकीय शिक्षण संचनालयाच्या ताब्यात जाणार आहे. परिणामी वैद्यकीय शिक्षण खात्याने तो रस्ता कायम ठेवला तर प्रतापसिंहनगर व परिसरातील युवकांना रोजगार मिळणार आहे. परंतु जर वैद्यकीय शिक्षण संचनालयाने रस्ता देण्यास विरोध केला तर पर्यायी रस्ता शोधण्याचे काम शासनाला करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)