मेजर गोगोई यांना युवतीशी मैत्री पडली महागात…

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – मेजर लितुल गोगोई यांना एका काश्‍मिरी युवतीशी मैत्री महागात पडली आहे. त्यापायी त्यांचे कोर्ट मार्शल होऊन त्यात मेजर गोगोई हे दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे निश्‍चित असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.

मे महिन्यात एका स्थानिक युवतीसह श्रीनगरमधील ग्रॅंड ममता हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पोलीसांनी त्यांना अटक केली होती. स्थानिक महिलांशी संपर्क ठेवू नयेत असे आदेश असतानाही 23 मे रोजी एका स्थानिक महिलेला घेऊन आपल्या कार्यकक्षेची मर्यादा सोडून जाण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण मेजर गोगोई यांना ओळखत असून स्वत:च्या मर्जीने त्यांच्याबरोबर आले होते असे त्या युवतीने म्ह्टले आहे. त्यांची फेसबुकवर ओळख झाली होती. आदिल अदनान या नावाने गोगोई यांनी फेसबुक अकाऊंट उघडला होता. मात्र आदिल अदनान म्हणजे मेजर गोगोई हे त्या युवतीला नंतर माहीत झाले होते.

लष्कराचा कोणीही अधिकारी दोषी आढळल्यास त्याला कठोर शासन देण्यात येईल असे सेना प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले होते. कोर्टमार्शलमध्ये गोगोई दोषी आढळले आहेत. गेल्या वर्षी जम्मू-काश्‍मीरच्या श्रीनगर मधील लोकसभा पोट निवडणुकीदरम्यान 9 एप्रिल रोजी स्थानिक जमाव लष्करावर दगडफेक करत असताना मेजर गोगोई यांनी बचावासाठी ढाल म्हणून एका व्यक्तीस जीपच्या समोर बांधले होते. त्या वेळी मेजर गोगोई चर्चेत आले होते.

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी मेजर गोगोई यांच्या या कृतीचे समर्थन केले होते आणि त्यांच्या सततच्या दहशतवादविरोधी कारवायांबद्दल प्रशस्तिपत्राने सन्मानित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)