मॅरेथॉन स्पर्धेत सुरज, गौरी प्रथम

राजगुरुनगर- येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन व हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये सुरज घोगरे, तर मुलींमध्ये गौरी राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकविला.
या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्‌घाटन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. एम. जरे, डॉ. संजय शिंदे, प्रा. ए. बी. कानवडे, प्रा. दिलीप मुळूक, प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. योगेश वाळुंज उपस्थित होते. दरम्यान, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 5 तर विद्यार्थिनींसाठी 3 कि.मी. अशा दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत सुमारे 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये सुरज घोगरे, दत्तात्रय शिंदे, विजय ढोबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर विद्यार्थिनींमध्ये प्रथम गौरी राऊत, द्वितीय ऐश्वर्या खळदकर, तृतीय क्रमांक अक्षदा वाघ यांनी पटकवला. या सर्वांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेच्यानिमित्ताने परिसर स्वच्छ ठेवू, आरोग्यासाठी धावू हा संदेश देण्यात आला. चांडोलीच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयाच्या वतीने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली तर खेड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली होती. महाविद्यालयातील जीमखाना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.प्रतिमा लोणारी, प्रा.आर.जी.राजळे, प्रा. एस. बी. गोरे, प्रा. वाय. बी. मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक तर प्रा. संतोष गावडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)