मॅट्रिमोनियल साईटवरुन महिलांना गंडवणारा भामटा गजाआड

नागपूर: मोठा उद्योगपयी असल्याचे सांगून विधवा, घटस्फोटित आणि एकट्या राहणाऱ्या श्रीमंत महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास नागपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. हा आरोही मॅट्रिमोनियल वेबसाईट्‌सच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करत असे.

कधी अजय अग्रवाल, कधी अजय कुंभारे, तर कधी अजय चावडा… वेगवेगळी नावे सांगून या आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आपण मोठा उद्योगपती असल्याचे भासवून अजय विवाहोच्छुक महिलांना ठिकठिकाणी भेटण्यासाठी बोलवायचा. त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांच्या संपत्तीची माहिती घ्यायचा. त्यानंतर महिला श्रीमंत असल्यास तिच्याशी लग्न करायचा. काहीच दिवसांनी महिलांची चल-अचल संपत्ती विकून तो फरार होत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोपीने 23 ऑगस्टला अशाच पद्धतीने वर्ध्यातील एका महिलेला नागपूरच्या बेसा परिसरात भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर डस्टर कारमध्ये तिच्यासोबत बळजबरीचा प्रयत्न केला. या प्रसंगी महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे गाडीभोवती नागरीक जमा झाले. पीडित महिला आपली तक्रार सांगत असताना आणखी एका महिलेने पुढे येऊन याच भामट्याने काही महिन्यांपूर्वी लग्नाचे सोंग घेऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचे सांगितले.

त्यानंतर बेलतरोडी पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांनी अजय अग्रवाल असे नाव सांगणाऱ्या या भामट्याला अटक केली. पोलिसांच्या मते अजयने आजवर अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केली असून त्याला आणखी काही आरोपींनी मदत केली असावी, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)