मृत व्यक्तीचेही रिटर्न भरा!

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्यासंबंधी अनेक जबाबदाऱ्या कायदेशीर वारसदारांवर येतात. यात मृत व्यक्तीचे शेवटचे प्राप्तीकर विवरणपत्र भरणे, त्याचे पॅनकार्ड, आधारकार्ड सेवा बंद करण्यासंदर्भात कागदपत्रे दाखल करणे आदींचा समावेश आहे. मृत व्यक्तीचे आयटीआर दाखल केल्याने भविष्यातील अनेक कायदेशीर अडचणींपासून सुटका मिळू शकते.

प्राप्तीकर विवरणासाठी महत्त्वाची बाब 
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसदाराला कर भरावा लागेल अशी तरतूद प्राप्तीकर कायद्यात आहे. जसे की, संबंधित व्यक्ती हयात असली असती तर त्याने आपली जबाबदारी पार पाडली असती. आपण जर कायदेशीर उत्तराधिकारी असाल तर सर्वात अगोदर प्राप्तीकर विभागाशी संपर्क करून मृत व्यक्तीचे कायदेशीर प्रतिनिधी म्हणून नोंदणी करा. ऑनलाइन फायलिंगच्या वेळी कायदेशीर वारसदारासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यास मंजुरी मिळताच मृत व्यक्तीचे आयटीआर भरण्याचा अधिकार मिळतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर भरणाची जबाबदारी
जर मृत व्यक्तीचे आयटीआर भरले जात नसेल तर कर भरण्याची जबाबदारी ही कायदेशीर वारसावर येते. प्राप्तीकर विभागाला ही थकबाकी वसूल करण्याचा देखील अधिकार आहे.

पॅनकार्ड जमा करणे
मृत व्यक्तीचे पॅनकार्ड जमा करण्यासाठी आपल्याला क्षेत्रिय अधिकाऱ्यांसमोर अर्ज करावा लागेल. यात पॅनकार्ड रद्द करण्याचे कारण नमूद करावे लागते. त्याच्या जन्म दाखल्याबरोबरच मृत्यूप्रमाणपत्राची कॉपी देखील जोडावी लागेल.

आधारला बायोमेट्रिक ब्लॉक करणे
एखाद्याच्या मृत्यूनंतर आधार कार्डचे बायोमेट्रिकला ब्लॉक करणे गरजेचे आहे. ब्लॉक केल्यानंतर त्याचा वापर होणार नाही. ऑनलाइनवरही एक सिक्‍युरिटी कोड मृताच्या मोबाईल नंबरवर येतो आणि ही प्रक्रिया पूर्ण करता येते. यूआयडीएआयच्या संकेतस्थळावर लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिकचा पर्याय उपलब्ध असतो.

या प्रक्रियेचे पालन करा
– प्राप्तीकरच्या संकेतस्थळावर फायलिंग अकाऊंटला क्‍लिक करा
– यात माय अकाऊंटच्या टॅबवर क्‍लिक करा
– यात ऍड किंवा रजिस्टर ऍज रिप्रजेटिंव्हच्या पर्यायावर जा.
– यात लीगल हेअरशिप (कायदेशीर वारस) म्हणून निवडा.
– मृताचा पॅन नंबर, बॅंक खाते, मृत्यूची तारीख याची नोंदणी करा.
– मृत्युप्रमाणापत्राची पीडीएफ, पॅन डिटेल आणि कायदेशीर वारशाचे प्रमाणपत्र सादर करा.
– ऑनलाइनवर मृत व्यक्तीविषयी भरलेली माहिती काळजीपूर्वक एकदा तपासून घ्यावी आणि सबमिट करा. मंजुरीची प्रतीक्षा करा.

– शैलेश धारकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)