मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत

सातारा – पोलादपूर येथील आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच या अपघाताची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा महसूल तथा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचबरोबर भविष्यात असे अपघात घडू नयेत म्हणून शिफारशी सुचविण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मृतांच्या नातेवाईकांना आवश्‍यक असणारी सर्व ती मदतही सरकार करील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या अपघातांच्या पाश्वभूमीवर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची घोषणा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)