मुस्लिम ब्रदरहूडच्या 75 सदस्यांना फाशीची शिक्षा: इजिप्त न्यायालयाचा निकाल

कैरो: इजिप्तमधील एका न्यायालयाने मुस्लिम ब्रदरहूडच्या 75 सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या सर्वांवर पोलीसांची हत्या आणि हिंसक दंगलीत सहभागी होण्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. कैरोच्या न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता हे प्रकरण विचारासाठी बड्या मुफ्ती’कडे पाठवण्यात येणार आहे.
सन 2013 मध्ये लष्कराने तत्कालीन राष्ट्रपती मुहम्मद मुर्सी यांना पदच्युत केले होते. त्याच्या विरोधात मुस्लिम ब्रदरहूडने आंदोलन केले होते.झालेल्या दंगलीत मुस्लिम ब्रदरहूडचे शेकडो कार्यकर्ते आणि डझनावारी पोलीसकर्मी मारले गेले होते. मुस्लिम ब्रदरहूडचे नेते मुहम्मद बेदी आणि फोटो पत्रकार महमूद अबू जेदसह 739 जणांवर खटले दाखल करण्यात आले होते. त्यात 75 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. फाशीच्या शिक्षेत मुफ्तींचा निर्णय हा बंधनकारक नसतो. सामान्यत: न्यायालयाच्या शिक्षेला ते मंजुरी देतात.
सन 2014 मध्ये मुफ्ती यांनी मुहम्मद बेदीची फाशी रद्द केली होती आणि त्यांना जन्मठेप सुनावली होती. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 75 आरोपींपैकी 44 जण कैदेत असून 31 जण फरारी आहेत. मानवाधिकार संघटनेने एकाच वेळी 700पेक्षा अधिक जणांवर खटले चालवण्यावर टीका केली आहे. यापैकी अनेकजण शांतिपूर्ण मार्गाने आंदोलन करत होते असे त्यांचे म्हणणे आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)