मुशर्रफ यांच्या अटकेची सुचना इंटरपोलने नाकारली

इस्लमाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अटक करण्याची सूचना पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे इंटरपोलला केली होती पण त्या सुचनेचा अंमल करण्यास इंटरपोलने स्पष्ट नकार दिला आहे. मुशर्रफ सध्या दुबईत वास्तव्याला आहेत. त्यांच्या विरोधात पाकिस्तानात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. त्या खटल्याच्या झालेल्या सुनावणीच्यावेळी पाक सरकारच्या वकिलांनीच न्यायालयात ही माहिती दिली.

मुशर्रफ यांनी सन 2007 साली देशात बेकायदेशीरपणे आणिबाणी जाहीर केली होंती त्या अनुषंगाने त्यांच्यावर सध्या तेथे खटला सुरू आहे. मुशर्रफ यांना खटल्याच्या सुनावणीसाठी कोर्टापुढे केव्हा हजर करणार असा सवाल न्यायालयाने सरकारला केला. त्यावेळी पाकचे अंतर्गत व्यवहार खात्याचे सचिव नसीम खोखर यांनी सांगितले की आम्ही त्यांना अटक करा अशी मागणी करणारे पत्र इंटरपोलला पाठवले होते पण हा खटला राजकीय स्वरूपाचा आहे त्यात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही असे नमूद करून इंटरपोलने आमची ही विनंती अमान्य केल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावेळी कोर्टाने इंटरपोलकडून आलेले पत्र न्यायालयात सादर करण्याची सूचना सरकारी वकिलाला केली. आणि त्यांनी या खटल्याची सुनावणी 10 सप्टेंबर पर्यंत तहकुब केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)