मुळशी राष्ट्रवादीचा “आरटीआय’ रद्दला विरोध

पिरंगुट – केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा (आरटीआय) रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. यासंदर्भात निवासी नायब तहसीलदार भगवान पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, माजी सभापती कोमल बुचडे, माजी उपसभापती सारिका मांडेकर, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, महिला अध्यक्षा दीपाली कोकरे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, माजी अध्यक्ष अमित कंधारे, विद्यार्थीचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र इंगवले, योगेश ठोंबरे, प्रवीण धनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महादेव कोंढरे म्हणाले की, सर्व सामान्य जनतेसाठी असलेल्या माहिती अधिकार कायद्यात दुरुस्ती करून केंद्र सरकार कायद्याचा गळा घोटत आहे. सर्व सामान्यांच्या हितावह असलेल्या या कायद्यात बदल करू नये अशी आमची मागणी आहे, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.