मुळशी तालुक्‍यातील 402 जणांवर प्रतिबंध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पौड पोलिसांची कारवाई

पिरंगुट- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 402 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदिप जाधव, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुळशी तालुक्‍यात मोक्का अंतर्गत पाच जणांना तर सी.आर.पी.सी.कलम 107 प्रमाणे 117, सी.आर.पी.सी कलम 109 प्रमाणे 16, सी.आर.पी.सी कलम 110 प्रमाणे 33, सी.आर.पी.सी कलम 149 प्रमाणे 95 जणांना नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. सी.आर.पी.सी कलम 144(2)(3) प्रमाणे 109 इसमांना निवडणूकीच्या काळात मुळशी तालुक्‍यातून हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आलेले असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे 2 हद्दपार प्रस्ताव एकूण 16 सराईत व्यक्‍तींवर, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 56 ( ब) प्रमाणे 2 सराईत व्यक्‍तींविरोध 2 हद्दपार प्रस्ताव, एम.पी.डी.ए प्रमाणे 1 सराईताविरोध 1 प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. तसेच अवैध धंद्याविरूद्ध वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 93 प्रमाणे 8 व्यक्‍तींवर प्रतिबंध कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उपनिरीक्षक अनिल लवटे, उपनिरीक्षक महेश मोहिते, उपनिरीक्षक रेखा दुधभाते, हवालदार शंकर नवले, संदीप सकपाळ, सुनिल मगर, अब्दूल शेख, पोलीस नाईक संजय सुपे, सागर बनसोडे, महिला पोलीस शिपाई तृप्ती भंडलकर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे.

  • लोकसभा निवडणूक काळात मुळशी तालुक्‍यात शांतता अबाधित राहून कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुळशी तालुक्‍यातील 402 सराईतांवर प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच कारवाईचा हा आकडा वाढू शकतो.
    – अशोक धुमाळ, वरीष्ठ निरीक्षक, पौड पोलीस ठाणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.