मुलींना कराटेचे प्रशिक्षण गरजेचे -मोहिते

चिंबळी-पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात खेड तालुक्‍यात गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात महिलांवर होत असलेले अत्याचार व भ्रटाचार कमी होण्यासाठी व मुलींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटे स्पर्धेचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते यांनी मोई येथे केले.
खेड तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने मोई येथे राष्ट्रवादी युवतीच्या तालुका सरचिटणीस अमृता गवारी यांच्या वतीने मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कराटे स्पर्धेचे शुभारंभ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षा पुजा बुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असताना मोहिते बोलत होत्या. यावेळी सरपंच अरूण फडके, तालुका अध्यक्षा संध्या जाधव, नगरसेवक हनुमंत कुऱ्हाडे, शिवानी मेदनकर, शुभांगी पठारे, आनंद गवारी, उपसरपंच गीतांजली गवारी, पल्लवी गवारी, निर्मला कवडे, सारिका गवारी, अनुराधा गवारी, राहुल गवारी, मारूती येळवंडे, रवी गवारी, संतोष गवारी आदि मान्यवर उपस्थित होते. हे कराटेचे प्रशिक्षण मार्शल आरपार हिंजवडी यांच्या वतीने राजू गोसावी, नीतिन काकडे, शुभम विटकर देत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)